Crime | नवऱ्यानं बायकोचा हातच कापला! नवरा बायकोच्या भांडणांनी ‘या’ राज्यात गाठला कहर

धक्कादायक घटनांनी राज्य हादरलं!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : नवरा बायको म्हटलं की ओघाओघानं भांडण हे आलंच. पण भांडणाचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. नवरा बायकोत झालेल्या किरकोळ वादाचं भयंकर रुप पाहायला मिळालंय. घटना घडली आहे मध्य प्रदेशात. शुल्लक भांडणातून वैतागलेल्या नवऱ्याने बायकोची चक्क अंगठ्यासह तीन बोटंच तोडल्याचं समोर आलंय. मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील चिचोली गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती मिळतेय.

हेही वाचा – शोध शोध शोधले… छतावरती सापडले

कधी कुठे काय घडलं?

राजू वांशकर असं अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचं नाव आहे. हा सगळा प्रकार घडला गुरुवारी. गुरुवारी आरोपीचा पत्नीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. मात्र हा वाद विकोपाला गेला. हे भांडण इतकं पेटलं की रागाच्या भरात पतीने कुऱ्हाड घेतली आणि पत्नीवर वार केले. ही गोष्ट इथंच थांबली नाही. त्यानंतर झोपलेल्या बायकोच्या एका हाताचा अंगठा आणि दुसऱ्या हाताची दोन बोटंही तोडल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या दाम्पत्यामध्ये सातत्याने वाद सुरू होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. लोकसत्तानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. महिलेला जखमी अवस्थेत स्थानिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलंय.

हेही वाचा – Viral | Crime | पोलिसांसमोर तरुणाला बदडणाऱ्यांना अखेर अटक, पण पोलिसांवर चौफेर टीका

या घटनेसोबत मध्य प्रदेशात आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील पतीने पत्नीचा हातच कापल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.

पतीने पत्नीचा हात कापला आणि त्यानंतर तिला जंगलातच सोडून दिल्याची घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडालीये.या घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी याप्रकरणी कडक कारवाईचे आदेशही दिलेत.

हेही वाचा – Double Murder | Crime | 24 तासांच्या आतच दुहेरी हत्याकांडाचा छडा

काय म्हणाले मुख्यमंत्री पृथ्वीराज?

“मध्य प्रदेशात मागील १५ दिवसात तीन अशा घटना घडल्या आहेत, ज्यामुळे मला धक्का बसला आहे. तीन भगिणींचे पतींनीच हात कापल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. दुसरा कुणी हल्ला केला, तर गुन्हा आहे. पण पतीचं जर हाथ तोडत असेल, विश्वासघात आहे,”

हेही वाचा – CRIME | पोलिसानंच रचलं कारस्थान, अंबानींच्या घरासमोर स्फोटकं

हेही वाचा – CYBER CRIME! स्वप्नीलच्या करामती पाहून पोलिसही थक्क

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!