भारतीय संघावरील कोरोनाचे संकट गडद

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट: भारतीय संघामधील अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा झाली आणि संघातील सर्वच खेळाडूंवर कोरोनाची टांगती तलवार लटकू लागली. मालिकेतील दोन टी-20 सामने शिल्लक असताना भारतातील कृणालसह 7 आणखी खेळाडूंना सुरक्षेचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या विलगीकरणातील दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे.
हेही वाचाः पुरात घर कोसळलेल्या कुटुंबांना दीड ते २ लाख रुपयांची मदतः मुख्यमंत्री
युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांना कोरोना
या दोन खेळाडूंची नाव युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम अशी असून दोघांनाही वेगवेगळ्या विलगीकरणात ठेवलं असून मेडिकल टीम त्यांची काळजी घेत आहे. कृणालला मंगळवारी कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या निकट संपर्कातील खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जात होती. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी झालेल्या कोरोना टेस्टमध्ये चहल आणि गौथम दोघेही कोरोना निगेटिव्ह आढळले होते. त्यानंतर आज (शुक्रवारी) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये दोघांच्या टेस्टही कोरोना पॉजिटिव्ह आल्या आहेत.
हेही वाचाः कोरोना संकटात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी
कृणाल पंड्यापासून कोरोनाची लागण सुरु
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना भारताने जिंकल्यानंतर दुसरा सामना जो मंगळवारी (27 जुलै) होणार होता तो एकदिवस पुढे ढकलण्यात आला. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कृणालला कोरोनाची बाधा झाल्यामुळे इतर खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आणि त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. त्यानंतर 28 जुलैला खेळवलेल्या सामन्यातही कृणालच्या निकट संपर्कातील 7 जणांना स्पर्धेबाहेर ठेवले होते. त्यामध्ये हार्दीक पंड्या, के गौथम, इशान किशन, युझवेंद्र चहल, मनिष पांडे, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ या सात जणांना विलगीकरणात ठेवून इतर खेळाडूंना दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संधी दिली. आता या सात जणांमधील दोघांनाही कोरोनाची बाधा झाली असून इतर खेळाडूंवर देखील संकट कायम आहे.