CoWIN पोर्टलवर अधिक वेगानं करता येणार बुकींग

नोंदणी करण्यासाठी आता Captcha ची गरज नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या संसर्गापासून देशातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. परदेशी लसींच्या आयातीपासून देशातील विविध भागांमध्ये अगदी दूर्गम प्रदेशांतही लसीकरण मोहिम पोहोचली. अनेक नागरिक दररोज या लसीकरणाचा लाभ घेत आहेत. या मोहिमेसाठी CoWIN पोर्टलचीही मदत घेतली जात आहे. या पोर्टलवरील नोंदणीसाठी Captcha वापरला जात होता. पण, आता मात्र Captcha ची गरज नसल्यामुळे लसीकरण प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. 

हेही वाचाः सिंधुदुर्गात 7 जूनपासून चौथ्या टप्प्याचे निर्बंध लागू

CoWIN पोर्टल आणि अ‍ॅपवर नोंदणी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आता लाभार्थ्यांना चार अंकी कोड देण्यात येत आहे. हा कोड त्यांनी निर्धारित लसीकरण केंद्रावर दाखवणं अपेक्षित आहे. अनेक युजर्सनी कॅप्चाला बायपास करत लसीकरणासाठीची वेळ निर्धारित करण्याचा मार्ग शोधल्याचं वृत्त समोर आलं होतं. ज्यानंतर हा चार अंकी कोड इथं जोडण्यात आला. ज्यामुळं नोंदणीमध्ये केल्या जाणाऱ्या चुकीच्या कृत्त्यांवर आळाही बसणार आहे. 

हेही वाचाः डॉक्टरांवरचा भार कमी करण्यासाठी लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी

CoWIN पोर्टलवर अशा प्रकारे करा लसीकरणासाठीची नोंदणी 

– लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम CoWIN  अ‍ॅप किंवा संकेतस्थळावर भेट द्या. 
– ज्यानंतर तिथं Register/Sign in येथे क्लिक करा. 
– पुढे मोबाईल नंबर देऊन Get OTP वर क्लिक करा. 
– ओटीपी आल्यानंतर तो कॉपी करुन दिलेल्या जागेत पेस्ट करत वेरिफायवर क्लिक करा. 
– यानंतर Register for Vaccination हा पेज तुमच्यासमोर सुरू होईल. 
– इथं तुम्ही ओळखपत्र माहिती, नाव, लिंग, जन्मतारीख अशी माहिती भरणं अपेक्षित असतं. 
– सर्व माहिती भरल्यानंतर Register वर क्लिक करा. 
– रजिस्टर केल्यानंतर Appointment schedule हा पर्याय तुम्हाला दिसेल. 
– यानंतर Schedule  या पर्यायावर क्लिक करा. 
– पुढे सर्च बारमध्ये पिनकोड एंटर करा, किंवा जिल्ह्याच्या सहाय्यानं तुम्ही लसीकरण केंद्र शोधा. 
– ज्या लसीकरण केंद्रावर लसीसाठीच्या जागा उपलब्ध आहेत त्या दिसताच तुम्हाला हवी ती वेळ निवडून Confirm वर क्लिक करा. 

हेही वाचाः वाळपई छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिका उद्यानाचं सौंदर्यीकरण प्राधान्याने

कोविन वर एका मोबाईल क्रमांकावर चार सदस्यांची नोंदणी करता येऊ शकते. इथं तुम्ही लसीकरणासाठी निर्धारित तारीख बदलूही शकता. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!