शेणालाही भाजप प्रतिष्ठा मिळवून देणार तर…! मोदी है तो मुमकीन है

चेष्ठा नाही! गायीच्या विष्ठेपासून भारी भारी गोष्टी बनवल्या जाणार

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : ऐकून आश्चर्य वाटेल किंवा धक्का बसेल, पण खरंच शेणाला प्रतिष्ठा दिली जाणार आहे. ही प्रतिष्ठा भाजप सरकारचं एक खास अभियान प्राप्त करुन देणार आहे. गायीच्या शेणापासून अनेक गोष्टी बनवण्यात येणार आहेत. त्यात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मूर्तीही आहे. इतकंच काय तर घरात नांदणारी लक्ष्मीसुद्धा आहे. महत्त्वाचं म्हणजे शेणापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी किती लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, याचं टार्गेटसुद्धा ठरवण्यात आलेलं आहे. गायीच्या शेणापासून नेमकं काय काय बनवण्यात येणार आहे? कशाप्रकारे याची विक्री केली जाणार आहे? याबद्दलची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नुसतं शेण नव्हे… शायनिंग शेण

आता शेणापासूनच का या सगळ्या गोष्टी बनवल्या जात आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण यामागे एक खास कारण आहे. शेणाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं चंग बांधलेल्या कामधेनू आयोगाच्या अध्यक्षांनी एक जबरदस्त दावा केलाय. गायीच्या शेणामुळे मोबाईल रेडिएशन रोखता येणं शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच काय, तर मोबाईलमध्ये गायीच्या शेणाचा वापर व्हावा, असंही त्यांनी सुचवलंय. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष आहेत वल्लभभाई कथिरिया. त्यांच्या या दाव्यानंतर स्वाभाविकपणे चर्चांही जोरात सुरु झाल्यात.

वल्लभभाईंनी केलेल्या दावानुसार गायीचं शेण हे एन्टी रेडिएशन म्हणजेच विकिरण विरोधी आहे. महत्त्वाचं म्हणजे सोमवारी वल्लभभाई यांनी गायीच्या शेणापासून बनलेल्या एक चीपचं उद्घाटनही केलंय. ही चिप मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनला रोखण्यात बऱ्याच अंशी कामी येते, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

कथिरियांनी म्हटलंय.. की..

तुम्ही ऐकलं असेल की अक्षय कुमारने गायीचं शेण खाल्लं. तुम्ही खरंच शेण खाऊ शकता. हा एक दावा आहे. पण आपण आपलं विज्ञान विसरलोय. आता आम्ही याचा अभ्यास करुन शोध घेत आहोत. ज्याला आपण एक मिथक मानतो, त्या विषयाचं संशोधन करण्याचा आमचा मानस आहे.

काय आहे बातमी?

यंदा दिवाळीत देशभर गोमयापासून म्हणजेच शेणापासून बनलेल्या वस्तूंचा वापर केला जावा, यासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आलं आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगानं कामधेनू दीपावली अभियान असं या अभियानाला नाव दिलं आहे. या अभियानातून गायीच्या शेणापासून बनलेली उप्तादनं वापरण्यास प्रोत्सादन देण्यात येणारे.

यात प्रामुख्याने दिवे, मेणबत्त्या, धूप, उदबत्त्या, स्वस्तिक चिन्ह, पेपरवेट, होमासाठीची साधन सामुग्री तसंच लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती यांचाही समावेळ आहे. दिवळीच्या दिवसांमध्ये 11 कोटी कुटुंबांमध्ये गायीच्या शेणापासून बनलेले दिवे लावले जावेत, असं टार्गेटही फिक्स करण्यात आलंय. पशुपाल आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं तशी माहिती दिली आहे.

अयोध्या शहरात तीन लाख दिवे आणि वाराणसीमध्ये एक लाख दिवे लावले जाणारेत.. यामुळे विविध गो उप्तादन उद्योगात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. पण स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास तसंच गोशाळा आत्मनिर्भर होण्यासही मदत होणारे. चिनी दिव्यांना पर्याय म्हणून हे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक दिवे उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

कुठे कुठे काय काय बनतंय?

पाचशेहून अधिक तबेल्यांमध्ये एन्टी रेडिएशन चिप्सचा निर्माण सुरु आहे. यातल्या एका चीपची किंमत साधारण 50 ते 100 रुपये असेल, असं बोललं जातंय. एक माणूस तर अशा चिप्स अमेरिकेत निर्यात करतो, असंही सांगण्यात आलंय. अमेरिकेत हीच चीप १० डॉलरला विकली जाते, असं म्हणतात.

शेणावर नुसता पाय जरी पडला तर नाकं मुरडणारी लोकं आता शेणापासून बनलेल्या या सर्व गोष्टींना कसा प्रतिसाद देतात , हे पाहणं महत्त्वाचं आहे.

वल्लभभाईंनी नेमकं काय म्हटलंय, ते ही पाहा

हेही वाचा –

तुम्ही वापरत असलेला कॉन्डम आधीच वापरलेला असू शकतो!

गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधी आणि लोहियांचा काय रोल होता?

अमिताभची पहिली फॅन गोव्याची होती, हे माहितीये का? ही आहे ती

रोज डोक्यावरुन अंघोळ करणाऱ्यांनी हे वाचलंच पाहिजे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!