कोविशिल्डच्या दुसर्‍या डोससाठी CoWIN पोर्टलमध्ये बदल

आधीची अपॉईंटमेंट वैध राहणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी घेतलेला वेळ (अपॉईंटमेंट) वैध असेल आणि को-विन पोर्टलवर तो रद्द केला जाणार नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केलं. मंत्रालयाने म्हटलंय की को-विन पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले गेले आहेत, परिणामी लाभार्थ्याला पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांच्या आत ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळू शकणार नाही. 13 मे रोजी केंद्राने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील कालावधी 12-16 आठवड्यांपर्यंत वाढविला आहे.

हेही वाचाः बेजबाबदार, असंवेदनशील भाजप सरकार तातडीनं बरखास्त करा !

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती

मंत्रालयाने सांगितले, की भारत सरकारने या बदलाबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती दिली आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यास 12-16 आठवड्याच्या अंतराने सूचित करण्यासाठी को-विन पोर्टलमध्ये देखील आवश्यक बदल केले गेले आहेत.

हेही वाचाः 21 खाजगी इस्पितळांच्या 50 टक्के खाटांचा ताबा महिनाभर सरकारकडे

यापूर्वी दुसऱ्या डोससाठी घेतलेली अपॉईंटमेंट वैध राहणार

माध्यमांतील काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की को-विन पोर्टलवर दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांपेक्षा कमी कालावधीत ज्यांनी अॅपॉईंटमेंट घेतली आहे, त्यांना डोस न मिळताच माघारी यावं लागत आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वी दुसऱ्या डोससाठी अपॉईंटमेंट घेतली आहे, ती वैध राहणार आहे. यावेळी पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना दुसर्‍या डोस 84 दिवसांनंतर घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या भारतात लसीकरण मोहीम सुरू आहे, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लस वापरण्यात येत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!