मोठा दिलासा! ‘या’ महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लवकरच नियंत्रणात येणार असल्याचं भाकित करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशभराला दिलासा मिळण्याची शक्यताय. मात्र कोरोना नियंत्रणात आल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा पुन्हा कोरोना वायरलचा संसर्ग वाढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या महिन्यात नियंत्रणात येणार?
केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या एका समितीनं कोरोनाबाबत भाकित वर्तवलं आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना नियंत्रणात येईल. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची साथ काहीशी मंदावली असल्याचं आकडेवारीतून दिसतंय. रुग्णसंख्याही घटतेय. त्यामुळे या केंद्रीय समिनीं वर्तवलेला अंदाज सगळ्यांच्या दुष्टीने दिलासादायक मानला जातोय.
अंदाज वर्तवणारे तज्ज्ञ कोण?
आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या एक समिती नेमण्यात आली होती. मोदी सरकारनं ही समिती नेमील होती. या समितीमध्ये दहा शास्त्रज्ञांना समावेश करण्यात आला होता.. या समितीकडून कोरोनाच्या भारतातील प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी नवीन मॉडेल डेव्हलप करण्यात आलं.
त्याप्रमाणे भारतात सप्टेंबर महिन्यातच कोरोना प्रादुर्भावाने शिखर गाठलं होते. सप्टेंबरच्या मध्यात देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 10.17 लाख इतकी होती. परंतु, तोपर्यंत आपण वैद्यकीय सुविधा आणि चाचण्यांसह सर्व बाबतीत सक्षम झालेलो. परिणामी गेल्या महिन्याभरात या संख्येत सातत्याने घट दिसलीये. आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी ती हिवाळा आणि सणासुदीमुळे होईल, असं या अभ्यासातून सांगण्यात आलंय.
मास्क हवाच!
फेब्रुवारीत ही साथ आटोक्यात येईल, असा अंदाज वर्तवतानाच केंद्रीय समितीनं काही महत्त्वाच्या सूचनाही केल्यात आहेत. आपल्याला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणारच आहे. ते न केल्यास भारतातील कोरोना बाधितांची संख्या दीड कोटीच्या पार जाईल, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. काळजी न बाळगल्यास सणासुदीच्या दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या 25 ते 26 लाखापर्यंत वाढेल, असाही धोकादायक इशारा देण्यात आलेला आहे.