COVAXIN |  कोवॅक्सिन लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज

जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश होण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या आता कमी होत आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली होती. कॅनडा, ब्रिटन, सौदी अरेबिया, न्यूझीलंड यासारख्या देशांचा यामध्ये समावेश होता. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस  घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यास काही देशांनी नकार दिला होता. मात्र, कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. त्यांचा परदेशातील प्रवासाचा मार्ग सुकर होऊ शकतो. कारण, कोवॅक्सिन लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या विषयी निर्णय जाहीर होऊ शकतो.

हेही वाचाः नरदेव पाहिजे पण कोव्हिशिल्ड लस घेतलेलाच…

कोवॅक्सिनचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश

भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लसीचा समावेश जागतिक आरोग्य संघटेनेनं त्यांच्या यादीमध्ये करावा, यासाठी अर्ज केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून यावर जुलै ते सप्टेंबर दरम्यान निर्णय घेतला जाऊ शकतो. अमेरिका, ब्राझील, हंगेरी यासह एकूण 60 देशांमध्ये कोवॅक्सिन लसीला मान्यता मिळावी यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचाः राज्य सरकारने 59 कुटुंबांना दोन लाख रुपये दिले

कोरोना विषाणू संसर्गानंतर परदेशात प्रवास करायचा असल्यास लस घेणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसींची यादी तयार केलेली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत कोवॅक्सिन लसीचा समावेश नसल्यानं ती लस घेतलेल्यांपुढं अडचण निर्माण झाली होती.

हेही वाचाः आरोग्यमंत्र्यांनी आयव्हरमेक्टिन घोटाळ्यासाठी गोंयकारांची, काँग्रेसची माफी मागावी

कोरोना रुग्णसंख्या घटली

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता कोविडची साथ नियंत्रणात आल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण, गेल्या 24 तासांमध्ये देशभरात अवघ्या 86,498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट शिगेला असताना देशात प्रत्येकदिवशी चार लाखांच्या आसपास नवे रुग्ण सापडत होते. मात्र, आता हे प्रमाण एक लाखापेक्षा कमी झाल्याने ही भारताच्यादृष्टीने दिलासादायक बाब मानली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या आकेडवारीनुसार सोमवारी दिवसभरात देशभरात 86,498 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2123 जणांचा मृत्यू झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!