बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटवर ‘कोवॅक्सिन’ लस अधिक प्रभावी

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकच्या संयुक्त अभ्यासातून स्पष्ट

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: हैदराबादच्या भारत बायोटेकची लस कोवॅक्सिन  ही भारतात सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. 

हेही वाचाः खासगी रुग्णालयासाठी लसींच्या किमती ठरल्या

डेल्टा व्हेरिएंट देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार

डेल्टा व्हेरिएंट हा भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. तर बीटा व्हेरिएंट हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. 

हेही वाचाः VIRAL VIDEO | इवल्याशा कासवाने केले  जंगलाच्या राजाला हैराण

अभ्यास अद्याप प्रकाशित नाही

या तीन संस्थांनी केलेला अभ्यास अद्याप प्रकाशित करण्यात आला नाही. या अभ्यासासाठी कोरोनातून बरे झालेले 20 रुग्ण आणि दोन्ही डोस घेऊन 28 दिवस झालेले 17 लोकांच्या सँपल घेण्यात आले होते. कोवॅक्सिनची ही लस या दोन व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी असल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. 

हेही वाचाः 10 वर्षाच्या मुलांच्या नावावर दररोज 15 रुपये जमा करुन 28 लाख मिळवण्याची संधी

‘डब्ल्यूएचओ’ने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं केलं होतं नामकरण

जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे. 

हेही वाचाः ACCIDENT | शिवोली पुलावर जीपच्या धडकेत दोन गुरं ठार

डेल्टामुळे मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली

यामध्ये डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!