Coronavirus Updates: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा किंचित वाढ

24 तासांत 2219 जण दगावले; 24 तासांत देशात 92,596 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा किंचितशी वाढली आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार देशभरात आदल्या दिवशी 86,498 नव्या कोरोना  रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, आज ही संख्या तब्बल सहा हजारांनी वाढली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात 92,596 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट शिगेला असताना देशात प्रत्येकदिवशी चार लाखांच्या आसपास नवे रुग्ण सापडत होते. मात्र, आता हे प्रमाण एक लाखापेक्षा कमी झाल्याने ही भारताच्यादृष्टीने दिलासादायक बाब मानली जात आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात 92 हजार 596 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासांत 1 लाख 62 हजार 664 जण कोरोनातून बरे होऊन त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय. मागच्या 24 तासात देशात 2 हजार 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर सध्या देशात 12 लाख 31 हजार 415 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. देशातील एकूण मृतांचा आकडा 3 लाख 53 हजार 528 वर पोहोचलाय. तर आत्तापर्यंत 23 कोटी 90 लाख 58 हजार 360 जणांनी कोरोनावरील प्रतिबंधक लस घेतली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!