CORONA UPDATE | देशात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन मृत्यूंची नोंद

गेल्या 24 तासांत 94,052 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दररोज समोर येणारा आकडा भयावह आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 94,052 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसंच 6148 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच एक लाख 51 हजार 367 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजचे, काल दिवसभरात 63,463 एक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. यापूर्वी मंगळवारी 92,596 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

बुधवारी 20 लाख कोरोना चाचण्या

आज देशात सलग 28व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. 9 जूनपर्यंत देशभरात 24 कोटी 27 लाख 26 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 33 लाख 79 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसंच आतापर्यंत 37 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे. 

देशातील आजची कोरोनास्थिती : 

एकूण कोरोना रुग्ण: 2 कोटी 91 लाख 83 हजार 121
एकूण कोरोनामुक्त रुग्ण: 2 कोटी 76 लाख 55 हजार 493
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या: 11 लाख 67 हजार 952
एकूण मृतांची संख्या: 3 लाख 59 हजार 676

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.22 टक्के

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.22 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 94 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 5 टक्क्यांच्या कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर एकूण बाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधित मृत्यू भारतात झाले आहेत. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!