16 वर्षांच्या मुलाने घेतली कोरोनाची लस; आणि मग…

मध्य प्रदेशातील मुरेना जिल्ह्याच्या अंबाह तालुक्यातील घटना; मुलाची ही अवस्था पाहून कुटुंबीय हादरलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

भोपाळः मध्य प्रदेशातील मुरेनामध्ये 16 वर्षांच्या एका मुलाला कोरोना लसीकरणादरम्यान भयावह परिणाम झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लस घेतल्याच्या काही वेळात मुलाची तब्येत बिघडली. ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचाः तिसऱ्या लाटेची भीती? आंतरराष्ट्रीय शेड्युल फ्लाईटस ‘या’ तारखेपर्यंत सस्पेंड

लस घेतल्यानंतर मुलाची तब्येत बघिडली

ही घटना मुरेना जिल्ह्यातील अंबाह तालुक्यातील आहे. येथे कमलेश कुशवाह नावाच्या व्यक्तीचा मुलगा पिल्लूला कोरोना लस देण्यात आली होती. ही लस मुरेना जिल्हा रुग्णालयापासून 35 किमी अंतरावरील एका सेंटरवर देण्यात आली होती. वृत्त संस्थेच्या सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, लस घेतल्यानंतर पिल्लूला चक्कर येऊ लागली. त्याशिवाय त्याच्या तोंडातून फेसही येऊ लागला. मुलाची ही अवस्था पाहून कुटुंबीय हादरलं. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी ग्वाल्हेर येथे पाठविण्यात आलं.

घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबीयांकडून लसीकरण सेंटरवर गोंधळ

या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी लसीकरण सेंटरवर गोंधळ घातला. या प्रकरणात आरोग्य प्रमुखांनी सांगितलं की, त्याला ग्वाल्हेरला जाण्यास सांगितलं होतं मात्र तो घरी गेल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. मात्र एका अल्पवयीन मुलाला कोरोना लस कशी काय देण्यात आली, असा सवाल त्यांनी केला आहे. याशिवाय पिल्लूच्या आधार कार्डाचा देखील तपास करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः ‘नवरा-बायको आणि ती’ प्रकरण! निलंबित झालेल्या पोलिसाची लांबलचक Facebook Post

मुलाच्या तब्येतीबाबत अद्याप माहिती नाही

आतापर्यंत कोरोना लसीकरणाच्या परिणामांच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्यात अद्यापही लहान मुलांसाठी कोरोनाची लस देण्याची परवानगी नाही. मात्र तरीही लालसेपोटी लस घेतल्याचा परिणाम मुलाला सहन करावा लागला आहे. मुलाच्या तब्येतीबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

हा व्हिडिओ पहाः POLITICS | SPECIAL REPORT | बाणावलीत नेत्यांची धुमश्चक्री आणि मतदारांची कोंडी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!