CORONA UPDATE | गेल्या 24 तासांत देशात 3 लाखांहून अधिक नवे कोरोना बाधित

3 हजाराहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात झपाट्याने पसरत आहे. देशातील गेल्या 24 तासाची कोरोना आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत 3 लाख 57 हजार 229  नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ लाख 20 हजार 289 रुग्ण कोरोनातून बरे होऊन त्यांना डिश्चार्ज देण्यात आलाय. दुःखद गोष्ट म्हणजे 3 हजार 449 जणांचा गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झालाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची आकडेवारी जाहीर केली आहे, तर एएनआयने याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे.

आत्तापर्यंतची देशातील कोरोना आकडेवारी

त्याचबरोबर कोरोना मृतांचा आकडाही वाढतो आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे तब्बल 2 कोटी 2 लाख 82 हजार 833 रुग्ण आढळले आहेत, तर 1 कोटी 66 लाख 13 हजार 292 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजवरचा मृतांचा आकडा हा 2 लाख 22 हजार 408 आहे, तर 34 लाख 47 हजार 133 सक्रिय रुग्ण आहेत. 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. गेल्या 24 तासांतील कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या ही जवळपास 3 हजाराच्या वर असल्याने या वाढत्या मृतांच्या आकडेवारीमुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी चिंता व्यक्त केली जातेय.

काळजी घ्या, सुरक्षित रहा

देशातील कोरोनाची घटलेली आकडेवारी काहीसा दिलासा देणारी आहे. पण म्हणून आपण कोरोना नियमांचं पालन करायची आता गरज नाही असं नाही. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं अपेक्षित आहे. कोरोनाला जर पळवून लावायचं असेल, तर आपणच स्वतःची काळजी घ्यावी लागेल. यासाठी मास्क वापरणं, सॅनिटायझर लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!