CORONA UPDATE | देशात १०२ दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली

मृतांची संख्याही घटली; सोमवारी ४६ हजार रुग्ण आढळले; करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात करोनाच्या दैनंदिन आकडेवारी घट होत आहे. गेल्या २४ तासात १०२ दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी देशात ३७ हजार नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल म्हणजे सोमवारी ४६ हजार रुग्ण आढळले होते. जवळपास ९ हजारांच्या फरकाने रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसंच मृतांच्या संख्येत देखील घट होत आहे. करोनामुळे ९०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरुन करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांनी निर्बंध हटवले आहेत. मात्र डेल्टा व्हेरिएंटचे नवीन संकट देशासमोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही राज्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

कोरोना मृतांचा आकडा घटला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील करोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत अर्थात सोमवारी देशात ३७,५६६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ हजार ९९४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या करोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे.

सध्या देशात ३,९७,६३७ बाधित रुग्णांवर उपचार

१७ मार्च नंतर म्हणजे १०३ दिवसानंतर करोनाची आकडेवारी ३८,००० हजाराच्या खाली आली आहे. यापूर्वी १७ मार्च रोजी ३५,८३८ करोना रुग्ण आढळले होते. आतापर्यंत देशात ३,०३,१६,८९७ करोना रुग्ण आढळले. यापैकी २,९३,६६,६०१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ३,९७,६७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ३,९७,६३७ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!