CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या खाली

मागच्या 24 तासांत 1 हजारापेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांनी प्राण गमावले

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 48 हजार 698 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 183 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने काहीसा दिलासा व्यक्त होत आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 48 हजार 698 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 183 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 64 हजार 818 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 1 लाख 83 हजार 143 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 91 लाख 93 हजार 85 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 94 हजार 493 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 95 हजार 565 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 31 कोटी 50 लाख 45 हजार 926 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचाः ‘डेल्टा प्लस’चा महाराष्ट्रातला पहिला बळी रत्नागिरीत

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 48,698

देशात 24 तासात डिस्चार्ज – 64,818

देशात 24 तासात मृत्यू – 1,183

एकूण रूग्ण –  3,01,83,143

एकूण डिस्चार्ज – 2,91,93,085

एकूण मृत्यू – 3,94,493

एकूण एक्टिव्ह रुग्ण – 5,95,565

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 31,50,45,926

एका दिवसातील लसीकरण – 61,19,169

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!