CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट

कोरोनाबळी एक हजाराखाली

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 46 हजार 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 979 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनाबळींचा आकडाही एक हजाराच्या खाली गेला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 46 हजार 148 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 979 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 58 हजार 578 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 2 लाख 79 हजार 331 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 93 लाख 9 हजार 607 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 96 हजार 730 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 72 हजार 994 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 46,148

देशात 24 तासात डिस्चार्ज – 58,578

देशात 24 तासात मृत्यू – 979

एकूण रूग्ण –  3,02,79,331

एकूण डिस्चार्ज – 2,93,09,607

एकूण मृत्यू – 3,96,730

एकूण एक्टिव्ह रुग्ण – 5,72,994

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 32,36,63,297

एका दिवसातील लसीकरण – 17,21,268

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!