CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 12 हजारांनी वाढ

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; कोरोनाबळी दसपट अधिक

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 12 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 42 हजार 15 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच (20 जुलै) गेल्या 125 दिवसांतील निचांकी आकड्याची नोंद झाली असताना पुन्हा मोठी वाढ धडकी भरवणारी आहे. तर एका दिवसात 3 हजार 998 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. आदल्या दिवशी हा आकडा अवघ्या 374 वर आला असताना, कोरोनाबळीत जवळपास दहापटीने वाढ झाली आहे. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

हेही वाचाः गोव्यातील खाण व्यवसायावरील अवलंबितांचं संरक्षण करण्यात भाजप अपयशी

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 998 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 36 हजार 977 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 12 लाख 16 हजार 337 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 3 लाख 90 हजार 687 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 18 हजार 480 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 7 हजार 170 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 41 कोटी 54 लाख 72 हजार 455 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचाः भाजपकडून शिक्षक विभागाची स्थापना

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 42,015
देशात 24 तासात डिस्चार्ज – 36,977
देशात 24 तासात मृत्यू – 3,998
एकूण रूग्ण – 3,12,16,337
एकूण डिस्चार्ज – 3,03,90,687
एकूण मृत्यू – 4,18,480
एकूण एक्टिव्ह रुग्ण – 4,07,170
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 41,54,72,455
24 तासात लसीकरण झालेली संख्या – 34,25,446 

हा व्हिडिओ पहाः Crime | Breaking | अमर नाईक हत्याप्रकरणी मोठा खुलासा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!