CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला

सक्रिय रुग्णही वाढले; कोरोनाबळींत मात्र घट

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत जवळपास 3 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 41 हजार 806 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 581 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यानं आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्यानं दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 806 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 581 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 130 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 9 लाख 87 हजार 880 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 1 लाख 43 हजार 850 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 11 हजार 989 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 32 हजार 41 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 39 कोटी 13 लाख 40 हजार 491 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 41,806
देशात 24 तासात डिस्चार्ज – 39,130
देशात 24 तासात मृत्यू – 581
एकूण रूग्ण – 3,09,87,880
एकूण डिस्चार्ज – 3,01,43,850
एकूण मृत्यू – 4,11,989
एकूण एक्टिव्ह रुग्ण – 4,32,041
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 39,13,40,491
24 तासात लसीकरण झालेली संख्या – 34,97,058

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!