CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांवरच

कोरोनाबळी 3500 ने घटले; गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 383 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः  देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जेमतेम 1 हजाराने घट झाली. कालच्या दिवसात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात सापडणाऱ्या नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा काही दिवसांपूर्वी तीस हजारापर्यंत खाली पोहोचला होता, मात्र त्यानंतर पुन्हा होत असलेली वाढ धडकी भरवणारी आहे. सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही सलग दोन दिवस वाढ होत आहे. आदल्या दिवशी 3 हजार 998 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले होते. हा आकडा काल पुन्हा जवळपास 3500 नी घटून 507 वर आला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 383 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 507 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 652 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 12 लाख 57 हजार 720 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 4 लाख 29 हजार 339 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 18 हजार 987 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 9 हजार 394 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 41 कोटी 78 लाख 51 हजार 151 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचाः नारायण नाईक हल्ला प्रकरणः फरार संशयित फकिरची पोलिसांसमोर शरणागती; पोलिसांनी केली अटक

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 41,383
देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,652
देशात 24 तासात मृत्यू – 507
एकूण रूग्ण – 3,12,57,720
एकूण डिस्चार्ज – 3,04,29,339
एकूण मृत्यू – 4,18,987
एकूण एक्टिव्ह रुग्ण – 4,09,394
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 41,78,51,151

हा व्हिडिओ पहाः Video | मांद्रेतील विद्यार्थ्यांना Free WiFi Hotspot

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!