CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या खाली

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 26 हजारांनी घट झाली आहे. सोमवारच्या दिवसात 1 लाख 96 हजार 427 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आली. सोमवारच्या दिवसात 3 हजार 511 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही घट झाल्याने दिलासा मिळत आहे.
हेही वाचाः औषध उत्पादन-पुरवठा प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा दर्जा
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 96 हजार 427 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 511 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 26 हजार 850 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
India reports 1,96,427 new #COVID19 cases, 3,26,850 discharges & 3,511 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
— ANI (@ANI) May 25, 2021
Total cases: 2,69,48,874
Total discharges: 2,40,54,861
Death toll: 3,07,231
Active cases: 25,86,782
Total vaccination: 19,85,38,999 pic.twitter.com/9dFJubxH8D
आतापर्यंतची आकडेवारी
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 वर गेला आहे. देशात 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 7 हजार 231 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 25 लाख 86 हजार 782 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.