CORONA UPDATE | मोठा दिलासा! 44 दिवसांनंतर देशात कोरोनाग्रस्तांमध्ये निचांकी आकडे

कोरोनाबळींतही घट; कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 25 हजारांनी घट; गुरुवारी 3 हजार 660 कोविड बाधितांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 25 हजारांनी घट झाली आहे. गुरुवारच्या दिवसात 1 लाख 86 हजार 364 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 44 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे. गुरुवारच्या दिवसात 3 हजार 660 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मानला जात आहे.

हेही वाचाः पत्रकार वासु चोडणकर ठरले पहिले कोविड बळी

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 86 हजार 364 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 660 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 59 हजार 459 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 वर गेला आहे. देशात 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 18 हजार 895 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 23 लाख 43 हजार 152 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!