CORONA UPDATE |देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत 12 हजारांनी घट; कोरोनाबळीही कमी

शनिवारी 1 लाख 65 हजार 553 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 3 हजार 460 कोरोनाग्रस्तांना मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 12 हजारांनी घट झाली आहे. शनिवारी 1 लाख 65 हजार 553 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 46 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे. शनिवारी 3 हजार 460 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

हेही वाचाः गोवा विद्यापीठाचे ऑनलाइन वर्ग 7 जूनपर्यंत रद्द

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 460 रुग्णांना प्राण गमवावे लागले. शनिवारी देशात 2 लाख 76 हजार 309 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 78 लाख 94 हजार 800 वर गेला आहे. देशात 2 कोटी 54 लाख 54 हजार 320 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 25 हजार 972 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 21 लाख 14 हजार 508 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 20 लाख 66 हजार 614 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!