CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींची संख्याही घसरली

गुरुवारी 1 लाख 34 हजार 154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 2 हजार 887 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत  2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 34 हजार 154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 887 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

हेही वाचाः विवाहपूर्व समुपदेशनाचा प्रस्ताव रद्द करणारा भाजप, राजकीय घटस्फोट बंद करणार?

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 32 हजार 364 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 713 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 7 हजार 71 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 85 लाख 74 हजार 350 वर गेला आहे. देशात 2 कोटी 65 लाख 97 हजार 655 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 40 हजार 702 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 16 लाख 35 हजार 993 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 22 कोटी 41 लाख 9 हजार 448 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!