CORONA UPDATE | देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

70 दिवसांच्या निचांकी पातळीवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढत असलेला देशातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा खाली आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाच्या 84,332 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 70 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर काल दिवसभरात मृतांचा आकडा मात्र वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4002 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

गेल्या 24 तासातील कोरोना आकडेवारी

गुरुवारी देशभरात कोरोनाचे 91,702 नवे रुग्ण मिळाले होते. त्या तुलनेत काल नव्या रुग्णसंख्येत तब्बल 7 हजारांनी घट झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,21,311 इतकी आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 84,332

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,21,311

देशात 24 तासात मृत्यू – 4,002

एकूण रूग्ण – 2,93,59,155

एकूण डिस्चार्ज – 2,79,11,384

एकूण मृत्यू – 3,67,081

एकूण सक्रिय रुग्ण – 10,80,690

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 24,96,00,304

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!