CORONA UPDATE | देशात आढळले ५२,२५६ नवीन करोना रुग्ण

गेल्या ८८ दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात आढळले ५२,२५६ नवीन करोना रुग्ण; गेल्या ८८ दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या देशात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे.

कोरोनाचा प्रभाव होतोय कमी

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. देशात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. ICMR च्या माहितीनुसार आतापर्यंत देशात ३९,२४,०७,७८२ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासात १३,८८,६९९ करोना चाचण्या करण्यात आल्या.

रविवारी देशात ५२,२५६ नवीन करोना रुग्ण सापडले

रविवारी देशात ५२,२५६ नवीन करोना रुग्ण सापडले. तर ७७,१९० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत देखील घट होतं असल्याचं दिलासादायक चित्र आहे. देशात काल (रविवार) १४२२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन आढळलेल्या बाधितांची संख्या ८८ दिवसांपासून सर्वाधिक कमी आहे. यापुर्वी २३ मार्चला ४७,२३९ रूग्ण आढळले होते. त्यानंतर करोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला.

सध्या देशात ७ लाख ०२ हजार ८८७ बाधित रुग्णांवर उपचार

देशात आतापर्यंत २,९९,३५,२२१ करोना रुग्ण आढळले आहेत. तर २,८८,४४,१९९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसंच ३,८८,१३५ बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ७ लाख ०२ हजार ८८७ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!