CORONA UPDATE | देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

24 तासात 3303 जणांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: गेल्या 24 तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झालेली दिसत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात देशात कोरोनाच्या 80834 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3303 जणांचा मृत्यू झाला. तर काल दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 1,32,062 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

हेही वाचाः चकीत करणारी बातमी : लॉकडाऊन काळात पतिराजांचा होतोय छळ !

देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही चिंतेची गोष्ट आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 80,834

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,32,062

देशात 24 तासात मृत्यू – 3,303

एकूण रूग्ण – 2,94,39,989

एकूण डिस्चार्ज – 2,80,43,446

एकूण मृत्यू – 3,70,384

एकूण सक्रिय रुग्ण – 10,26,159

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 25,31,95,048

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!