CORONA UPDATE | गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 91,702 नवे रुग्ण

मृतांचा आकडाही वाढला

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात गेल्या 24 तासांत 91,702 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3403 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांचं प्रमाण घटत होतं. हा आकडा अगदी 60 हजारापर्यंत खाली गेला होता. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.

कोरोना रुग्णांचं प्रमाण 90 हजाराच्या पातळीपर्यंत

आता नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा 90 हजाराच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचलं आहे. त्यामुळे अजूनही देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचं दिसत आहे. मात्र, समाधानाची बाब इतकीच की देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्यानं वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,34,580 इतकी आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 91,702

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,34,580

देशात 24 तासात मृत्यू – 3,403

एकूण रूग्ण – 2,92,74,823

एकूण डिस्चार्ज – 2,77,90,073

एकूण मृत्यू – 3,63,079

एकूण सक्रिय रुग्ण – 11,21,671

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 24,60,85,649

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!