CORONA UPDATE | रुग्णसंख्या घटली, मात्र मृत्यूदराची चिंता कायम!

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट: कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात झपाट्याने पसरत आहे. त्याचबरोबर कोरोना मृतांचा आकडाही वाढतो आहे. या सगळ्ता दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. मात्र मृत्यूदराची चिंता अजूनही कायम आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे तब्बल 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 रुग्ण आढळले आहेत, तर 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मृतांचा आकडादेखील 2 लाखाच्या पार गेला असून 34 लाख 13 हजार 642 सक्रिय रुग्ण आहेत. 15 कोटी 71 लाख 98 हजार 207 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. गेल्या 24 तासांतील कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या ही जवळपास 3 हजाराच्या वर आहे. या वाढत्या मृतांच्या आकडेवारीमुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी चिंता व्यक्त केली जातेय.

गेल्या 24 तासात ३ हजार 417 इतके मृत्यू
देशात गेल्या २४ तासात 3 लाख 68 हजार 147 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ हजार 417 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 732 जण कोरोनातून बरे होऊन त्यांना डिश्चार्ज देण्यात आलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची आकडेवारी जाहीर केली आहे, तर एएनआयने याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे.
India reports 3,68,147 new #COVID19 cases, 3,00,732 discharges, and 3,417 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) May 3, 2021
Total cases: 1,99,25,604
Total recoveries: 16,29,3003
Death toll: 2,18,959
Active cases: 34,13,642
Total vaccination: 15,71,98,207 pic.twitter.com/C0UrYU3q44
काळजी घ्या, सुरक्षित रहा
देशातील कोरोनाची घटलेली आकडेवारी काहीसा दिलासा देणारी आहे. पण म्हणून आपण कोरोना नियमांचं पालन करायची आता गरज नाही असं नाही. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं अपेक्षित आहे. कोरोनाला जर पळवून लावायचं असेल, तर आपणच स्वतःची काळजी घ्यावी लागेल. यासाठी मास्क वापरणं, सॅनिटायझर लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे.