नियम फक्त सामान्यांसाठीच? राजकारण्यांचं काय?

मध्य प्रदेशातील घटना; पोलिसांनी वधूची कार केली पंक्चर, पण भाजपाची गाडी थांबवलीही नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोना वायरसची प्रकरणं सतत वाढत आहेत. अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केलाय. लोक घराबाहेर पडू नयेत म्हणून पोलिस-प्रशासन प्रयत्न करत आहेत. नियमांचं पालन न करणार्‍यांवर वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस कडक कारवाई केल्याच्या बातम्याही आहेत. मध्य प्रदेशातील रीवा इथून एक बातमी समोर आली आहे. लग्नानंतर पोलिसांनी घरी परतणार्‍या वधूची कार थांबविली आणि कारचे टायर पंक्चर केले. यानंतर त्या लोकांनी गाडीला धक्का देऊन गाडी घरापर्यंत पोहोचली.

वधूची गाडी केली पंक्चर, भाजपी गाडी अडवलीही नाही

आजवर हाती प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे पोलिस फक्त लग्नातून परतणाऱ्या नवविवाहित जोडप्यांच्या गाड्यांचीच हवा काढत आहेत असं नाही. अनेक गाड्यांसोबत त्यांनी हेच केलंय. परंतु पोलिसांची ही कारवाई सुरू असताना त्याचवेळी एक स्कॉर्पियो जवळून गेली. स्कॉर्पियोवर भाजपाचा झेंडा होता. पोलिसांनी ती गाडी अडवलीही नाही.

हेही वाचाः 5 राज्य आणि 2 पोटनिवडणूक निकालाचा आगामी गोवा विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होणार?

वधू-वराच्या गाडीसोबतच असं का?

मध्य प्रदेश सरकारने कोरोना काळात लग्नासंदर्भात नवीन नियम जारी केले होते. ज्याअंतर्गत कुटुंबातील सदस्य घरात लग्नाचं आयोजन करू शकतात. सभागृह, मंदिरांमध्ये लग्न करण्यास परवानगी नाही. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय डाबर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचं अनुसरण करून आयोजित करण्यात येत असलेल्या लग्नसमारंभांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नियम मोडणाऱ्यांवरच कारवाई केली जात आहे. मात्र, लग्नानंतर घरी परतणाऱ्या वधू-वरासोबत त्यांनी असं का केलं, याविषयी ते काहीच बोलले नाहीत.

हेही वाचाः 2020 मध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू तरुणांचे

आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करा. घरीच राहा, आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडा. तेही पूर्ण सुरक्षेसह. म्हणजे केवळ मास्क लावून बाहेर पडा. सॅनिटायझर सोबत ठेवा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!