क्लिनिकल चाचण्यांमध्ये मोठा खुलासा! लस घेऊनही 20 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी नाही, लवकरच बूस्टर डोसला परवानगी ?

काही लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण हे 30 ते 40 हजार

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही जवळपास वीस टक्के लोकांच्या शरीरात अँटिबॉडिज तयार झाल्या नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या नव्या माहितीमुळे आता बूस्टर डोसची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या नव्या माहितीमुळे आगामी काळात लवकरच बूस्टर डोसला परवानगी मिळू शकते असा अंदाजही व्यक्त केला जातोय.

काही लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण हे 30 ते 40 हजार

याबाबत द न्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने सविस्तर माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार भुवनेश्वर येथील एका रिसर्च युनिटमधील जवळपास वीस टक्के सदस्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. असे असले तरी त्यांच्यातील अँटिबॉडीजचे प्रमाण नकारात्मक नोंदवले गेले. ही माहिती समोर आल्यानंतर भुवनेश्वर येथील इंस्टीट्यूट ऑफ लाइफ सायंन्सचे (ILS) संचालक डॉ. अजय परिदा यांनी अँटिबॉडीजविषयी अधिक माहिती दिली आहे. काही लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण हे 30 ते 40 हजार आहे. हेच प्रमाण 60 ते 100 च्या दरम्यान असते तर संबंधित व्यक्ती अँटिबॉडी पॉझिटिव्ह आहे, असे आपण म्हणू शकलो असतो. मात्र, ज्या लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण हे तीस ते चाळीस हजारांमध्ये आहे ते अँटिबॉडिज निगेटिव्ह आहेत.

लसीकरण झालेले असताना बुस्टर डोसची गरज

भुवनेश्वर येथील इन्स्टीट्यूट इंडियन ही संस्था SARS-CoV-2 जीनोम कंसोर्टियम (INSACOG) चा एक भाग आहे. SARS-CoV-2 जीनोम कंसोर्टियममध्ये (INSACOG) देशभरातील 28 प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूवर अभ्यास केला जातो. या सर्व प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूचे जीनोम सिक्वेंसिंग केली जाते. या संस्थेच्या रिपोर्टमध्येही ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांच्या शरीरात अँटिबॉडीची पातळी चार ते सहा महिन्यांनी कमी होत गेल्याचं आढळून आलं, असं सांगण्यात आलंय. ज्या लोकांच्या शरारीत अँटिबॉडीजची संख्या निगेटिव्ह किंवा कमी आहे, त्या लोकांना बूस्टर डोसची गरज आहे, असेही अजय परिदा यांनी सांगितले आहे.

कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीनची परिणामकारकता 70 ते 80 टक्के

अजय परिदा यांनी कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या परिणामकारकतेविषयी अधिक माहिती दिली आहे. या दोन्ही लसी 70 ते 80 ट्कके प्रभावी आहेत. या आकडेवारीवरून ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांच्या शरीरात 20 ते 30 ते तीस टक्के अँटिबॉडी तयार होऊ शकत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने बूस्टर डोसवर सध्यातरी बंदी घातलेली आहे. मात्र असे असले तरी लवकरच बूस्टर डोसला हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे. देशात आतापर्यंत 73.73 पेक्षा जास्त लोकांना कोरोना लसीचे डोस मिळालेले आहेत.

हा व्हिडिओ पहाः FRAUD | हॉटेलवर छापा टाकून रॅकेटचा पर्दाफाश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!