नग्न फोटोप्रकरणी मिलिंद सोमणविरुद्ध तक्रार

गोव्यातील बिचवर काढला होता नग्न फोटो

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : मॉडेल पूनम पांडेच्या अश्लील व्हिडिओचा विषय ताजा असतानाच अभिनेता मिलिंद सोमणचा नग्न फोटोही वादात सापडलाय. मिलिंद सोमणने स्वत: गोव्यातील एका बिचवर नग्नावस्थेत धावतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या संदर्भात सोमणवर कारवाई करावी, अशी तक्रार गोवा सुरक्षा मंचकडून पोलिसांत करण्यात आलीय.

अश्लील व्हिडिओचं प्रकरण पूनम पांडेच्या अंगलट आल्यानंतर आता मिलिंद सोमणविरुद्ध तक्रार दाखल झालीय. गोवा सुरक्षा मंचाकडून वास्को पोलिसांत सोमण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. गोव्यातील एका बिचवर नग्न अवस्थेत धावत असल्याचा फोटो मिलिंद सोमण यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावरून वादंग सुरू आहे. गोव्यात हा फोटो व्हायरल झाल्यानंतर गरमागरम प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. गोवा सुरक्षा मंचानं याची दखल घेउन वास्को पोलिस स्थानकात सोमणविरुद्ध तक्रार दाखल केली.

गोव्याची बदनामी सहन करणार नाही

या संदर्भात आरएसएसच्या गोवा प्रांताचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. या नटनट्या गोव्यातच येउन असले उद्योग का करतात? हे प्रकार थांबले पाहिजेत. पोलिसांनी अशा स्वैर वागण्यावर नियंत्रण ठेवायला हवं. अशा प्रकारांमुळे गोव्याची प्रतिमा खराब होते. गोवा हे वर्ल्ड टुरिझम डेस्टिनेशन आहे. त्यामुळे असे प्रकार घडल्यानंतर जागतिक पातळीवर गोव्याची प्रतिमा डागाळली जाते. अशा प्रकारांना गोमंतकीयांनी मुळीच खपवून घेता नये, असे वेलिंगकर म्हणाले.

हेही वाचा…

पूनम पांडेला पती सॅम बॉम्बेसह कळंगुट पोलिसांकडून अटक

पांडेवर गुन्हा… सोमणचं कौतुक, असं कसं? दिग्दर्शकाच्या ट्वीटनं नवी चर्चा

मिलिंद सोमण 55 वर्षाचे झाले! त्यांचा बीचवरचा नग्न फोटो पाहून गिरीश चोडणकर म्हणाले…

पहा फेसबुक लाइव्हवरची चर्चा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.