बापानंच केली पोटच्या पोरांची गळा दाबून हत्या

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशच्या महोबामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्याने पत्नीशी झालेल्या वादानंतर पोटच्या निरागस मुलांची हत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पत्नीशी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर हा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सध्या हे मृतदेह पोस्टमॉर्टेम करण्यासाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी हत्या करणाऱ्यालाही अटक केली असून आता अधिक तपास सुरु आहे.
उत्तर प्रदेश राज्यात महोबकंठ नावाचा एक जिल्हा आहे. तिथे एक छोटंसं गाव आहे, ज्याचं नाव आहे परापातर. याच गावात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीशी वाद झाल्यानंतर हत्यारा पिता आपल्या मुलांना घेऊ एक डोंगराजवळ घेऊन गेला. तिथंच त्यानं आपल्या मुलांची गळा दाबून हत्या केली असल्याचं सांगितलं जातंय. हरनारायण असं आरोपीचं नाव असून, त्याचं आपली पत्नी रीनासोबत भांडण झालं होतं, असंही प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या भांडणानंतरच त्यानं टोकाचं पाऊल उचलत आपल्या दोन मुलांची हत्या केली आहे. भांडण नेमकं कोणत्या कारणावरुन झालं, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र यात 7 वर्षांच्या आशिष आणि 4 वर्षांच्या आर्यनचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.
बापाने पोटच्या मुलांना संपवलं
गावातील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. तसंत पोलिसांनी आरोपी बाप हरनारायणलाही अटक केली आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबावर मोठा आघात झाला. धक्कादायक घटनेनं पीडित कुटुंबाचे नातेवाईक हादरुन गेले आहेत. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार घरगुती वादातून ही घटना घडली असल्याचं कळतंय. सध्या पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.