अभिमानास्पद! सागर चव्हाण यांना ‘नेल्सन मंडेला’ पुरस्कार

टेनिसपटू पेस, भिनेत्री झरीना खान यांच्या उपस्थितीत वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोकणचे नंबर १ महाचॅनेल ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांना प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड टेनिसपटू लियांडर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री झरिना खान यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच बहाल करण्यात आला.

नेल्सन मंडेला नोबेल प्राईज अवार्ड अकॅडमीच्या वतीने गोवा येथील पंचतारांकित मेरीयट रिसॉर्ट येथे मोठ्या दिमाखात हा सोहळा नुकताच पार पडला. समाजात निरपेक्ष हेतूने कार्य करणाऱ्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, करोना वॉरियर्स आदींसह सामाजिक कार्यकर्त्यांचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर द अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड आणि डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली.

नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड अॅकडमीचे चेअरमन डॉ. राजकुमार टाक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. टेनिसपटू लियांडर पेस, इंडिया सिनेमा डायरेक्टर श्रीकुमार मेनन, बॉलिवूड अभिनेत्री झरिना खान, इंडियन रेसलर संग्राम सिंग, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, श्याम नरेन फाऊंडेशनचे चेअरमन कैलाश बिहारी सिंग आदींना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. कोकणचे नंबर १ महाचॅनेल ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्यासह काही कोरोना योद्ध्यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्डने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार टाक, सचिव डॉ. जोशुवा इमानूएल, उपाध्यक्ष डॉ. विजसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!