पेडण्याची सून आणि मुंबईच्या महापौर म्हणत आहेत, मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज

५ टक्के बेशिस्त लोकांमुळे ९५ टक्के लोकांना धोका

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील कोरोना स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध तर महाराष्ट्रात लावण्यात आलेले आहेतच. मात्र त्यांचं पालन कितपत होतंय, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईची आरोग्य यंत्रणा कोणत्याही क्षणी कोमलडेल अशीच भयावह स्थिती आहे. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर पेडण्याची सून आणि मुंबईच्या महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. सध्याची कोरोना परिस्थिती पाहता, मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

corona update

हेही वाचा – CORONA UPDATE | धक्कादायक । निवडणुकीच्या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला दुप्पट

बेशिस्त लोकांना अक्कल कधी येणार?

मुंबईतील ९५ टक्के जनता कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करते आहे. मात्र अजूनही ५ टक्के लोक बेजबाबदारपणे वागत असून नियम पाळत नसल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. त्यामुळे ५ टक्के बेशिस्त लोकांचा फटका ९५ टक्के लोकांना बसण्याची भीती असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईत कडक लॉकडाऊन लागू करण्याची गरज असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.

कोरोनाचा प्रसाद वाटत बसू नका- महापौर

कुंभमेळ्याहून आपआपल्या राज्यात परतलेले कोरोना प्रसाद वाटत फिरण्याची शक्यताय. त्यामुळे आपआपल्या राज्यात कुंभमेळ्यातून परलेल्यांनी क्वारंटाईन होण्याची गरज आहे. मुंबईतही कुंभमेळ्यातून परलेल्यांना क्वारंटाईन केलं जातंय.

चिंताजनक आकडेवारी

१६ एप्रिलची मुंबईची आकडेवारी चिंताजनक अशीच म्हणावी लागेल. 16 एप्रिलला संध्या 6:00 वाजता आलेल्या अहवालानुसार दिवसभरात 8,839 रुग्ण आढळून आले, तर 24 तासात बरे झालेल्या 9033 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण-85 हजार 226 इतके आहेत. दरम्यान, मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 43 दिवसांवर आलाय.

हेही वाचा – CORONA | कोरोनावरील घरगुती औषधाचा दावा किती सत्य?

खबरदारीसाठी मायक्रो कंटेनमेन्ट

मुंबई वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मायक्रो कंटेनमेन्ट झोन घोषित करण्यात आले आहेत. मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणजे काय?

पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायटींना मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणतात. एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते. अशा सोसायट्या आता मायक्रो कंटेनमेंट घोषित करण्यात येणार आहेत. सोसायट्यांनी तसा गेटबाहेर फलक लावणे आवश्यक आहे.

हेही वाचा – CORONA VACCINE | ‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो?

या सोसायट्यांनी कोव्हिड संबंधी नियम पाळणे बंधनकारक आहे. बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेश देऊ नये. संबंधित गृहनिर्माण सोसायटीने या सर्वाचे निरीक्षण करुन नियमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी घ्यावी, असे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र सोसायटीने नियमाची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीला दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

संबंधित सोसायटीने पुन्हा दुर्लक्ष करुन नियम मोडल्यास 20 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे आदेश दिले असून त्याबाबत परिपत्रकही जारी केले आहे.

महत्त्वाचे नियम काय?

– इमारतीबाहेर पोलिस तैनात करण्यात येतील
– बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेशबंदी
– वर्तमानपत्र विक्रेत्यांनी सोसायटीच्या गेटवर वर्तमानपत्र द्यावे
– जीवनावश्यक वस्तू आदी साहित्यही सोसायटीच्या गेटवर स्वीकारावे
– सोसायटीतील व्यक्तीला कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांनी लॅबच्या व्यक्तीला घरी बोलवावे
– कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडल्यास एफआयआर दाखल होणार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!