Ludoमध्ये वडिलांनी चीटिंग केल्यानं मुलगी थेट कोर्टात!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
भोपाळ – हल्ली माणसं कोणत्या गोष्टीमुळे दुखावली जातील, याचा काहीही नेम नाही. तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण एका 24 वर्षांच्या तरुणीने लुडोमध्ये चीटिंग केली म्हणून आपल्या वडिलांविरुद्धच थेट कोर्टात दाद मागितलीये. वडिलांनी लुटे खेळताना चीटिंग केली असल्याचा आरोप भोपळामधीळ तरुणीने केलाय. 24 वर्षांच्या या तरुणीने केलेल्या या तक्रारीमुळे चर्चांना ऊत आला आहे.
मुलीचं म्हणणं काय आहे?
खरंतर माझा वडिलांवरती खूप विश्वास होता, असं 24 वर्षींय तरुणींचं म्हणणंय. पण लुडो खेळताना वडिलांनी फसवणूक करत माझा विश्वासघात केल्याचं या मुलीचं म्हणणं आहे. त्यामुळे या तरुणीने कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात तातडीनं लक्ष घातलंय. या मुलीचं काऊन्सिंलिंगही करण्यात आलं. एका महिला कॉन्सिलरने तब्बल 4 वेळा या तरुणींचं समुपदेशन केलंय. त्यानंतर या मुलीच्या वागण्यात बदल दिसून आल्याचं कळतंय. आपल्या वडिलांविषयी या मुलीच्या मनात प्रचंड कटुता आणि तिरस्कार निर्माण झाला होता. यापुढेही या मुलीचं समुपदेशन काही काळ सुरु राहणार असल्याचं सांगितलं जातंय.
कोरोनामुळे अनेकजण सध्या घरी आहेत. अशातच वेळ जात नसल्यानं अनेकांनी लुडो खेळणं पसंद केलंय. मात्र हा खेळ रक्ताच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण करतोय की काय, अशीही चर्चा रंगू लागली आहे. या घटनेच्या निमित्तानं लुडो खेळणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलवून टाकला आहे. सध्या अनेक घरांत लुडो मोठ्या प्रमाणात खेळला जातो. मात्र या अजब प्रकारामुळे लुडो भलतंच वळण घेत असल्याचं समोर आलं आहे. याआधीही भारतात लुडोवरुन अनेक विचित्र घटना घडल्यात. वादावादी, मारहाणा असे विचित्र प्रकार देशाच्या अनेक भागात घडलेत आहेत. खासकरुन गुजरात, बडोद्यामध्ये ऑनलाईन लुडोमुळे गंभीर घडल्या आहेत. बडोद्यात एकाने लुडोतील पराभव सहन न झाल्यानं पतीनं पत्नीला जबर मारहाण केली होती. असेच प्रकार आता भविष्यात वाढत असल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय.