पेट्रोल पंपासमोरच कंटेनर उलटला! दैव बलवत्तर म्हणून ड्रायव्हर आश्चर्यकारकरीत्या बचावला

मालवाहू कंटेनर डिव्हायडरवर पलटी

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे. कणकवली जवळील एका पेट्रोल पंपावर भीषण अपघात झालाय. या अपघातातून ड्रायव्हर आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. मात्र ड्रायव्हरच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळतेय. बुधवारी रात्री हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, मालवाहू कंटेनर डिव्हायडरवरच पलटी झालाय. वळणाचा अंदाज न आल्यानं हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा – रंगपंचमीला गालबोट! रंग खेळून अंघोळीसाठी गेलेला बारावीचा विद्यार्थी बुडाला

नेमका काय झालं?

कणकवलीतील वागदे पेट्रोल पंपाजवळील गोपुरी आश्रमाच्या समोर कंटेनरचा अपघात झाला. बुधवारी मध्यरात्री सुमारे १२:३० ते १ वाजण्याच्या सुमारास हायवेवर माल वाहतूक करणारा ट्रक उलटला. या ट्रकचा नंबर RJ 23 GB 1521 असा आहे. राजस्थानातील ट्रकचा हा अपघात काळजाचा थरकाप उडवणारा असा होता. १० ते १२ चाकी कंटेनर पलटी थेट डिव्हायडरवरच पलटी झालाय. चालकाला तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असावा अशी, शक्यता वर्तवली जातेय.

हेही वाचा – Accident Video | तळीरामाचा प्रताप फार्मसी कॉलेजजवळ ६ गाड्यांना ठोकलं

हायवे प्राधिकरणाने वागदे पेट्रोल पंपावरील डिवायडेशन अत्यंत चुकीच्या पद्धतीने ठेवल्याने चालकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला जातोय आहे. त्यामुळे अनेक वेळा गंभीर अपघात होण्याची दाट भीती व्यक्त केली जातेय. यावर तातडीनं खबरदारीचा उपाय काढण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.

महाराष्ट्रात केलेल्या जमावबंदी आणि संचारबंदी आदेशानुसार महामार्ग पोलिस पेट्रोलिंगसाठी फिरत असताना हा अपघात झाल्याची समोर आली. त्यावेळी पोलीस तातडीने तिथे हजर झाले. यानंतर अपघातग्रस्त ड्रायव्हरला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल सुमित चव्हाण यांनी दिली. यावेळी पोलीस हवालदार रविकांत झरकर, पोलीस नाईक किशोर पाडावे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित चव्हाण महामार्ग पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – पणजीनंतर आणखी एका ठिकाणी मद्यधुंद चालकाचा कहर, 8 जणांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!