जगाचं एक टेन्शन संपलं! चीनचं रॉकेट ‘या’ ठिकाणी कोसळलं

अंतराळात अनियंत्रित झालेले चीनचे रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: नियंत्रण गमावलेले चीनचं रॉकेट काही तासांमध्ये पृथ्वीवर कोसळलं असल्याची माहिती चीनच्या माध्यमांनी दिली आहे. चीनच्या माध्यमांनुसार, नियंत्रण कोसळलेलं रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं आहे. त्यामुळे आता अनेकांना सुटकेचा निश्वास सोडला आहे.

अखेर रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं

अमेरिकन स्पेस फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, हे रॉकेट 18 हजार मैल प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होतं. बीजिंगमधील स्थानिक वेळ सकाळी 10.24 वाजण्याच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेत आलं होतं. हिंदी महासागरात या रॉकेटचे अवशेष कोसळले असल्याचं वृत्त चीनच्या माध्यामांनी चीनच्या अंतराळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. रॉकेटचे अवशेष भारत-श्रीलंकेच्या दक्षिण-पश्चिम भागात हिंदी महासागरात कोसळल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पृ्थ्वीच्या वातावरण कक्षेत शिरत असताना रॉकेटचा बहुतांशी भाग जळून खाक झाला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रॉकेटचे अवशेष मालदीवच्या हद्दीत कोसळले आहेत.

हेही वाचाः लाँगमार्च 5 बी उपग्रह पृथ्वीवर आदळण्याचा धोका

जमिनीवर कोसळण्याऐवजी समुद्रात कोसळण्याची शक्यता होती

रॉकेटचा हा तुकडा जमिनीवर कोसळण्याऐवजी समुद्रात कोसळण्याची शक्यता अधिक होती. चीनचा 2021-035B हे रॉकेट 100 फूट लांब आणि 16 फूट रुंद आहे. आतापर्यंतच्या अंदाजानुसार हे रॉकेट दक्षिण-पूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनेझुएला, दक्षिण युरोप, उत्तर किंवा मध्य आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण भारत किंवा ऑस्ट्रेलियाजवळ कोसळण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेने म्हटलं होतं.

हेही वाचाः CORONA UPDATE | सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारपेक्षा जास्त मृत्यू

अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र

अमेरिकेच्या अंतराळ स्थानक केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू झाला आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच हे 21 टन वजनाचं ‘लाँग मार्च ५ बी’ श्रेणीतील रॉकेट लाँच केलं होतं. अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र उभारलं जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होतं. मात्र, त्याआधीच नियंत्रण गमावल्यानं चिंता वाढली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!