ओमिक्रॉन रुग्ण सापडलेल्या कर्नाटकात प्रवेशासाठी तपासणी

कर्नाटक सरकारकडून आठ दिवसांपासून नाका-बंदी सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सध्या देशासह राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत पसरत आहे. हा व्हेरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलीये. या व्हेरिएंटचे दोन रुग्ण बाजुच्या कर्नाटक राज्यात आढळून आल्याने महाराष्ट्राची धाकधूक वाढली आहे. पण, कर्नाटक सरकारने मात्र याबाबतच्या खबरदारी घेण्यास आधीच सुरुवात केलीये.

कर्नाटक सरकारकडून आठ दिवसांपासून नाका-बंदी सुरु

कर्नाटक सरकारने आपल्याआधी सीमेवर नाकाबंदी आणि चेकपोस्ट लावले आहेत. कोगनोळी टोल नाक्यावर गेल्या आठ दिवसांपासून नाका-बंदी सुरु आहे. यामध्ये दोन लस घेतलेल्या वाहनधारकांनाच फक्त कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच, प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय कोणालाही कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. त्यामुळे वाहनधारक आणि पोलिसांमध्ये वादावादीचे प्रकारही होऊ लागले.

कर्नाटकात जाणाऱ्यांची तपासणी

कर्नाटक सरकारने या ठिकाणी नाकाबंदी केली असून परराज्यातून येणाऱ्या सर्व वाहनधारकांची तपासणी केली जातेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!