कोरोना लसीकरणाबाबत केंद्राची मोठी घोषणा

येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणारेय. त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल. यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आलीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीरमनं उत्पादीत केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्स या दोन लसींचं लसीकरण करण्यात येणार आहे.

कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरू

१6 जानेवारीपासून देशभरात होणार्‍या कोरोना लसीकरणाबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणालेत केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून कोरोनाची ही लस सर्वसामान्यांना दिली जाईल. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षभराच्या आतच भारताना कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. कोरोनाची ही लस सर्वात आधी डॉक्टर, नर्स यासारखे आरोग्य कर्मचारी, सैनिक यासारख्या कोरोना योद्धांना दिली जाणार आहे. यानंतरच्या टप्प्यात कोरोना लस ही 50 हून अधिक वय असलेल्या किंवा 50 हून कमी वय आजारी असलेल्या व्यक्तींना दिली जाईल. संपूर्ण देशात येत्या दहा दिवसात कधीही कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होईल.

आम्ही कोरोना लसीकरणासाठी तयार

कोरोनावरील लसीची सगळं जगच आतुरतेने वाट पाहतंय. देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार असल्याने सगळ्यांचाच जीव भांड्यात पडलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत सांगितलंय, आम्ही कोरोना लसीकरणासाठी तयार आहोत. मात्र लसीकरणाची अंतिम तारीख सरकारकडून निश्चित करण्यात येईल. डीसीजीआयने 2 आणि 3 जानेवारीला लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

लसीकरणासाठी तीन कोटी कोरोना योद्धांना प्राधान्य

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य विभागातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलंय. सैन्य दल आणि पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना कोवीन अ‌ॅपवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. सामान्य व्यक्तींना कोरोना लसीसाठी नोंदणी करावी लागेल.

लस प्रत्येक बूथवर पोहोचण्यासाठीची सिस्टम तयार

राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस ही प्रत्येक बूथवर पोहोचण्यासाठी पूर्ण सिस्टम तयार करण्यात आलीये. तसंच प्रत्येक राज्याने यासाठी युनिट तयार केलंय. यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो.

देशात चार ठिकाणी लसीचा साठा

मुंबई, कर्नाल, चेन्नई आणि कोलकातामध्ये या चार प्रमुख ठिकाणांवर कोरोना लसीकरणाचा साठा केला जाणारेय. त्यानंतर 37 पुढील टप्प्यात लसीकरण ठिकाणांवर लस साठवली जाईल. लसीच्या वाहतुकीसाठी विमानसेवेचा वापर केला जाणारेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!