करोनासोबतच इतर आजारांच्या प्रतिबंधासाठी केंद्राच्या मार्गदर्शन सूचना

साथीचे आजार रोखण्यासाठी सरकारनं कंबर कसली

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : करोनासोबतच इतर आजारांच्या प्रतिबंधासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. कोविड-19 सोबतच डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, इत्यादी आजारांच्या प्रतिबंधासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ऋतुबदलाच्या काळात होणारे हे आजार कोविड 19 च्या तपासणी आणि निदानाबाबत नवं आव्हान निर्माण करू शकतात, असं मंत्रालयानं म्हटलंय.

सततचं नियंत्रण आणि जागरुकतेच्या आधारे या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो, यासाठी लसीकरण, कीटनाशकांची धरळणी तसंच जीवाणूजन्य आजारांना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारांना दिलेत.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुरू केलेली टेलिमेडिसीन प्रणाली ई-संजीवनी सुविधा अल्पावधीतच रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये लोकप्रिय होत आहे. आतापर्यंत पाच लाख लोकांना या सेवेचा लाभ झाला आहे. सध्या ही सुविधा २६ राज्यामंध्ये दोन प्रकारात सुरू आहे. एका प्रकारात डॉक्टर्स एकमेकांशी चर्चा करतात तर दुसऱ्या प्रकारात रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतात.

राज्यात ज्येष्ठांसाठी विशेष उपाययोजना

राज्यातील ज्येष्ठ रुग्णांसाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत ५० हून अधिक वय असलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याचा दिवसातून तीन वेळा आढावा घेतला जाणारे. आरोग्य खात्याचे कर्मचारी त्यांना फोन करुन ही माहिती देणार आहेत. आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी ही माहिती दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!