कोविड-19 लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारच्या‌‌ महत्त्वाच्या सूचना

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सूचनांना मान्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात चालू असलेल्या कोविड-19 लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन कोविड-19 ने (एनईजीव्हीएसी) काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. कोविड महामारीची उत्क्रांत परिस्थिती, जगभरातील उदयोन्मुख वैज्ञानिक पुरावे आणि अनुभव लक्षात घेऊन, ‘एनईजीव्हीएसी’ने कोविड-19 लसीकरणासंबंधी खालील शिफारशी केल्या आहेत, ज्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्वीकारल्या आहेत.

‘एनईजीव्हीएसी’ने कोविड-19 लसीकरणासंबंधी केलेल्या सूचना

खालील परिस्थितीत कोविड-19 लसीकरण स्थगित करण्याची सूचना ‘एनईजीव्हीएसी’कडून देण्यात आली आहे.

लॅबमध्ये कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यास कोविडमधून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी कोविड-19 लसीकरण करता येणार आहे.

सार्स -2 कोविड-19 रुग्ण, ज्यांना अँटी सार्स-2 मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा कॉन्व्हेलेसेंट प्लाझ्मा देण्यात आले आहेत, असे लोक हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांनी कोविड-19 लस घेऊ शकतात.

एखाद्या व्यक्तीने कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि दुसरा डोस घेण्याअगोदर जर त्या व्यक्तीला कोविड-19 ची लागण होते, अशा परिस्थितीत कोविड-19 चा दुसरा डोस कोविड-19 आजारातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर घेता येणार आहे.

रुग्णालयात दाखल करणं किंवा आयसीयू काळजी घेण्याजोगा असलेला आजार किंवा इतर कोणताही गंभीर सामान्य आजार असलेल्या व्यक्तींनीही कोविड-19 लस घेण्यापूर्वी 4-8 आठवडे प्रतीक्षा करावी.

एखाद्या व्यक्तीला कोविड-19 ची लागण झाली असेल तर त्या व्यक्तीने रक्तदान करण्यासाठी कोविड-19 मधून बरं झाल्यानंतर 14 दिवसांनी आरटी – पीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच रक्तदान करावं.

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोविड-19 लसीकरणाची शिफारस केली जाते.

कोविड-19 लसीकरणापूर्वी रॅपिड आर्टिजेन टेस्ट (आरएटी) द्वारे लस प्राप्तकर्त्यांच्या तपासणीची आवश्यकता नाही

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!