प्रधानमंत्री नागरी आवास योजनेंतर्गत ७०८ प्रस्तावांना केंद्रसरकारची मंजुरी

१३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः प्रधानमंत्री नागरी आवास योजनेंतर्गत घरं बांधण्याचे ७०८ प्रस्ताव केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीनं मंजूर केले. समितीची ५४ बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. त्यावेळी देशभरात एकूण ३ लाख ६१ हजार घरकुलं बांधण्यासाठीच्या या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचाः ‘येस’ बँकेच्या ‘एफडी’च्या व्याजदरात बदल

विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांची घोषणा

केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या वतीनं गृहनिर्माण क्षेत्रातल्या योगदानासाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी केली. राज्यसरकार, केंद्रशासित प्रदेशांची प्रशासनं, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लाभार्थी यांच्यात निकोप स्पर्धा असावी यादृष्टीनं गृहनिर्माण क्षेत्रातल्या १०० दिवसांच्या कामगिरीवर आधारित हे पुरस्कार दिले जातील.

हेही वाचाः शिवोलीतील पेट्रोल पंपाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र रद्द

१ कोटी १२ लाख ४० हजार घरकुलांच्या बांधकामाला मंजुरी

कोविड-१९ महामारीचा फटका बसून थंडावलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी मिळावी तसंच निर्धारित वेळेत गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण व्हावं यावर सरकारचा भर आहे. या कामासाठी आतापर्यंत १ कोटी १२ लाख ४० हजार घरकुलांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली असून केंद्रसरकारने एकूण मंजूर केलेल्या एक लाख ८१ हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यापैकी ९६ हजार ६७ कोटी रुपये यापूर्वीच जारी केले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!