अवघ्या काही दिवसांत शाळा सुरु होणार, तारीखही ठरली!

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी: 15 ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्यात शाळा सुरू करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना केंद्राने महत्वाचे निर्देश दिले आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वत:च्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षा या बाबतच्या एसओपी ठरवाव्यात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. या बाबतचा आदेश सोमवारी केंद्र सरकारने काढला.
या आधी केंद्र सरकारने अनलॉक 5 प्रणाली जाहीर केली होती. यात राज्ये व केंद्रशासित प्रदेश 15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्याविषयी निर्णय घेऊ शकतात. शाळा टप्प्याटप्प्यात सुरू कराव्यात, असा सल्ला देण्यात आला होता.
कोविड 19 महामारीमुळे देशातील सर्व यंत्रणा कोसळल्या. यात प्रामुख्याने शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. मुलांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मुलांना शाळेत पाठवणे बंद केले होते. ऑनलाईन शिक्षण पध्दतीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला होता. मागील जवळजवळ आठ महिने शाळा बंद होत्या. काही प्रमाणांत वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षक शाळेत जात असत.