CCTV VIDEO | चेकपोस्टवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

चेकिंग टाळण्यासाठी बाईकचा वेग वाढवला; बॅरीकेड पूर्ण वर जाईपर्यंत उशीर झाला; पोलीसांनी थांबवलं तर थांबाच!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: जगात कोरोना महामारीमुळे लोकांचा जीव जात असताना काळजाचा ठोका चुकवणारा एक अपघात घडला आहे. याला अपघात तरी कसं म्हणावं? कारण पोलीसांची चेकिंग टाळण्यासाठी दोन बाईकस्वारांनी गाडीचा वेग वाढवला आणि त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून जीवाचा थरकाप उडवणारी आहे.

नेमकं काय घडलं?

हा व्हिडिओ एका चेकपोस्टवरचा आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, 22 मे रोजी वन विभागाचे कर्मचारी चेकपोस्टवर गस्त घालत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या तपासणीसाठी बॅरीकेडसही लावलेले होते. एक कर्मचारी बॅरीकेडवर उभा आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोघेजण दुचाकीवर वेगात आले. कर्मचाऱ्यानं त्यांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्नही केला पण उलट दुचाकीस्वारांनी चेकिंग टाळण्यासाठी बाईकचा वेग आणखी वाढवला.

बॅरीकेड पूर्ण वर जाईपर्यंत उशीर झाला

बाईकस्वारानं वाढवलेला वेग पहाता, कर्मचाऱ्यानं बॅरीकेड हटवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला. बाईक चालवणाऱ्यानं मान बॅरीकेडच्या खाली वाकवून गाडीची स्पीड आणखी वाढवली, त्यात तो सुटला पण त्याच्या पाठीमागे बसलेला मात्र जीवानीशी गेला. त्याची मान वेगानं बॅरीकेडवर आदळली आणि तो खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. कोरोना काळातले बॅरीकेडस कोरोनामुळे ठिकठिकाणी चेकिंगसाठी बॅरीकेडस आणि चेकिंग पोस्ट उभारण्यात आलेत. वाहनांच्या तपासणी हे चेकपोस्ट आहेत. पण काही जण जीव धोक्यात घालून तो चेकपोस्ट चुकवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतायत. त्यातून अपघात वाढतायत. ते टाळायचं असेल तर नियमांचं पालन करणं हाच एकमेव उपाय आहे.

कुठली घटना

तेलंगणातल्या मंचेरियल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मंचेरियल जिल्ह्यातल्या तपालपूर गावात वनविभागाचा चेक पोस्ट आहे. या चेकपोस्टला जन्नाराम भागातला चेकपोस्ट म्हणूनही ओळखतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!