15 ऑगस्टची सुट्टी जिवावर बेतली; कारवरील नियंत्रण सुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पुणेः 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिवस. सुट्टीच्या निमित्ताने पुण्यातील एक कुटुंब पर्यटनासाठी पानशेत धरणावर गेलं होतं. पण, त्यांचं फिरणं हे जीवावर बेतलं आहे. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट धरणात बुडाली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती आणि मुलगा थोडक्यात बचावला आहे.
हेही वाचाः दलालांना इतरांना एजंट म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही
अचानक गाडीचे टायर फुटले
मिळालेल्या माहितीनुसार, पानशेत धरणाच्या परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. समृद्धी देशपांडे असं मृत महिलेचं नाव आहे. योगेश देशपांडे हे आपल्या पत्नी समृद्धी आणि मुलासोबत पानशेत धरणाजवळील रस्त्यावर वरून जात होते. त्याच दरम्यान अचानक गाडीचे टायर फुटले. गाडी वेगात असल्यामुळे योगेश देशपांडे यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यांनी गाडी थांबवण्याचा आटोकात प्रयत्न केला पण गाडी धरणाच्या पाण्यात बुडाली.
समृद्धीला गाडीतून बाहेर काढलं, पण…
सुदैवाने गाडीच्या पुढच्या बाजूस असलेला त्यांचा मुलगा आणि गाडी चालवत असलेले योगेश यांनी तातडीने गाडीच्या बाहेर उडी मारली. पण, मागच्या बाजूला बसलेली योगेश यांची पत्नी समृद्धी गाडीच्या काचा बंद असल्याने बाहेर पडू शकली नाही. अचानक आवाज झाल्याने जवळील हॉटेलमधील लोक मदतीला धावून आले. त्यांनी प्रयत्न करून गाडी बुडू दिली नाही. दोराच्या सहाय्याने खेचल्यानं गाडीने तळ गाठला नाही. मोठ्या मेहनतीने समृद्धी यांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्या मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं.
हेही वाचाः सुप्रसिद्ध अभिनेता नागार्जुनही झाला गोव्याचा भूमिपुत्र, 1/14वर नागार्जुनचं नाव
पोलिसांचा तपास सुरू
15 ऑगस्ट रविवारच्या सुट्टी निमित्ताने देशपांडे कुटुंब पानशेत धरण परिसरात पर्यटनाकरता गेलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलीस अधिक तपास करत आहेत.