ACCIDENT | भरधाव बस आणि कारची जोरदार धडक; अपघातानंतर बसने घेतला पेट, आणि…

5 जणांचा होरपळून मृत्यू; लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

झारखंड: एका भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. झारखंडमधील रामगड येथे हा अपघात झाला आहे. भरधाव बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर तात्काळ बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

कारमधील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारमधील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

रामगड जवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामगड जवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वच पाचही जण हे बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.

बस आणि कारने पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प

घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. भररस्त्यात बस आणि कारने पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र, अपघात झालेली कार ही बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!