75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन…

14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता हातात तिरंगा घेऊन प्रत्येक भारतीयाने राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन केले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आवाहन केले असून या उत्सवाचा एक भाग म्हणून 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता हातात तिरंगा घेऊन प्रत्येक भारतीयाने राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन केले आहे.

यानिमित्त केजरीवाल सरकार संपूर्ण दिल्लीत 25 लाख तिरंग्यांचं राज्यभर वाटप करणार आहेत. दिल्लीतील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी तिरंगा दिला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, “75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण मिळून तिरंगा फडकावू आणि आपल्या हातात राष्ट्रध्वज घेऊन राष्ट्रगीत गाऊ. दिल्लीतील प्रत्येक गल्ली-मोहल्ला आणि चौकात लोकांना राष्ट्रध्वज देण्यात येईल”. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी हातात तिरंगा घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील राष्ट्रगीत गाणार आहेत. संपूर्ण दिल्लीत सुमारे 100 विविध उत्सव आयोजित करण्यात आले आहेत.

केजरीवाल म्हणाले, “जेव्हा आपण हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गाऊ तेव्हा आपण सर्वांनी भारताला जगातील सर्वात महान आणि बलवान राष्ट्र बनवण्याची शपथ घेतली पाहिजे. प्रत्येक मुलाला उत्कृष्ट शिक्षण, प्रत्येक नागरिकाला जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, प्रत्येक घराला वीज आणि पाणी पुरवठा आणि प्रत्येक तरुणाला रोजगार, हे जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत भारत जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र होऊ शकत नाही. 75 व्या स्वातंत्र्यदिनी, आपण 130 कोटी भारतीयांनी एकत्र येऊन भारताला जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनवण्याची शपथ घेतली पाहिजे”.

भारत यावर्षी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करणार आहे म्हणून प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने तो साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ आणि ‘हर हाथ तिरंगा’ यासारखे अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. आज मला देशातील जनतेला आवाहन करायचे आहे की, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाही त्याच उत्साहाने साजरी करावी. 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता आपण सर्वजण एकत्र येऊ आणि हातात तिरंगा आणि हृदयात देशभक्ती घेऊन राष्ट्रगीत गाऊया, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

केजरीवाल यांनी दिल्लीत विशाल तिरंगा वितरण मोहिमेची योजना आखली असून आप सरकार 25 लाख तिरंगा संपूर्ण दिल्लीत वितरित करणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, “ज्यांना राष्ट्रध्वज विकत घ्यायचे आहे ते घेऊ शकतात. बालचमू स्वतः झेंडे रंगवू शकतात. आमच्या सरकारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी तिरंगा दिला जाईल. दिल्लीतील प्रत्येक गल्ली आणि मोहल्ल्यामध्ये तिरंग्याचे वितरण करण्याचे आमचे ध्येय आहे. दिल्लीच्या प्रत्येक चौकात तिरंगा उंच उडावा अशी आमची इच्छा आहे. मी सर्वांना विनंती करतो की या उपक्रमात सहभागी होऊन संपूर्ण राज्य देशभक्तीच्या भावनेने अभिमानाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा”.

ते पुढे म्हणाले, “जेव्हा आपण हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गाणार, तेव्हा सर्वांनी भारताला जगातील सर्वात बलवान आणि महान राष्ट्र बनवण्याची शपथ घेतली पाहिजे. भारताला जगातील सर्वोत्कृष्ट देश बनवायचे आहे. प्रत्येक मुलाला उत्कृष्ट शिक्षण दिल्याशिवाय आपला देश जागतिक नेता बनू शकत नाही. प्रत्येक शहर आणि खेड्यामध्ये उत्कृष्ट आरोग्य सुविधा दिल्याशिवाय भारत जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनू शकत नाही. प्रत्येक गावात उत्तम रस्ते, प्रत्येक घरात वीज आणि पाणी पुरवठा, प्रत्येक बेरोजगार तरुणाला उत्तम रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. महिलांच्या भरभराटीसाठी आपल्याला हा समाज सुरक्षित बनवायचा आहे. जोपर्यंत आपण हे पूर्ण करत नाही, तोपर्यंत आपण एका सशक्त राष्ट्राची हमी देऊ शकणार नाही.”

मुख्यमंत्री शेवटी म्हणाले, “आम्ही 130 कोटी भारतीयांनी मिळून भारताला जगातील प्रथम क्रमांकाचे राष्ट्र बनविण्याची शपथ घेतली पाहिजे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मीही हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गाणार आहे. दिल्लीत सुमारे 100 विविध कार्यक्रम आयोजित केले जातील ज्यात 130 कोटी भारतीय मिळून भारताला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनवण्याची शपथ घेतील”.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!