दोन हजार जणांवर बेकारीची कुऱ्हाड, डिजीटल स्ट्राईकचा फटका

आज ना उद्या ऍप्स सुरु होतील अशी अपेक्षा होती. पण...

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : टिकटॉक अल्पावधित किती हिट झालं, हे वेगळं सांगायला नकोच. टिकटॉक चालवणारी बाईट डान्स ही कंपनी. या कंपनीचे इतरही अनेक ऍप्स गाजलेत. मात्र भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं चीनला दणका दिला. आणि त्यानंतर आता बाईट डान्स ही कंपनी भारतातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारी आहे. त्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या तब्बल दोन हजार भारतीयांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

अपेक्षांवर पाणी

२०२०मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह ५९ चायनीय ऍप्स बॅन करण्यात आले. हे ऍप्स आज ना उद्या सुरु होतील, अशी अपेक्षा होती. मात्र या अपेक्षेवर पूर्णपणे पाणी फेरलंय. त्यामुळे आता टिकटॉक या ऍपची कंपनी बाईटडान्स भारतातून आपला गाशा गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. परिणाम दोन हजार कर्मचारी बेरोजगार होती आणि याची झळ त्यांच्या कुटुंबीयांना बसेल, हे नक्की.

७ महिन्यांपासून झळ

बाईट डान्सने ऍप्स पुन्हा सुरु करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र कंपनीच्या प्रवक्त्यांनी गेल्या ७ महिन्यांपासून याबाबत सरकारकडून कोणतेही निर्देश मिळत नसल्याची माहिती दिली आहे. तब्बल ७ महिने हे ऍप्स बंद असल्यानं आता दोन हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याशिवाय कोणताच पर्याय हाती उरला नसल्याचं कंपनीनं म्हटलंय. याचा फटका अनेकांना बसणार आहे. टिकटॉकवर बॅन येण्याआधी भारतात टिकटॉकचे तब्बल २० कोटीपेक्षा जास्त युजर होते. दरम्यान, कर्मचाऱ्यांना कमी करण्याबाबतचे ई-मेलही पाठवण्यात आलेत.

हेही वाचा – नोकरी शोधताय का? मग हे नक्की वाचा…

हेही वाचा – वर्क फ्रॉम होम करत असाल तर हे वाचाच!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!