दुर्दैवी! बसला आग, आगीत होरपळून 6 जणांचा बळी

भीषण दुर्घटनेनं होत्याचं नव्हतं केलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राजस्थानच्या जालोरमध्ये शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता बसला ११ हजार वोल्टच्या हायटेंशन लाइनमुळे आग लागली. या दुर्घटनेत सहा लोक जळून मरण पावले. ३६ लोक या आगीत होरपळले आहेत.

हेही वाचा – बापरे! कोरोनाची लस दिल्यानंतर 29 जण दगावले! कुठे?

सर्व लोक जैन समाजाचे आहेत. हे सर्वजण नाकोडा तीर्थाचे दर्शन करून अजमेर आणि ब्यावर येथे परतत होते. गूगल मॅपवरुन ब्यावरचा रस्ता पाहत असताना बस चुकून महेशपूरा गावात पोहोचली. गावाच्या गल्लीमध्ये अकरा किलो व्होल्ट केवीची लाइन खूप खाली होती. कंडक्टर तारांखालून बस सुटेल का हे पाहण्यासाठी बसवर चढला आणि तार हटवू लागला. याच वेळी करंट बसमध्ये पसरला आणि संपूर्ण बसने पेट घेतला.

अचानक लागलेल्या आगीमध्ये बसमधील ६ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. तर ३६ जणांना आगीची झळ पोहोचली. या भीषण आगीमध्ये बस जळून खाक झाली. यामध्ये जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.

पंतप्रधानांनीही व्यक्त केलं दुःख

हेही वाचा – Video | एकीचं बळ! दरीत पडलेल्या ट्रकला वाचवण्यासाठी अख्खा गाव एकवटला

महाराष्ट्रात मोठी दुर्घटना! नवजात बालकं आगीत होरपळून दगावली, मातांचा आक्रोश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!