भयंकर! यात्रेकरुंची बस कालव्यात कोसळली, 39 जणांना जलसमाधी

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिधी : यात्रेकरुंवर काळानं घाला घातला आहे. मध्य प्रदेशातील सिधी येथे मोठा अपघात झाला आहे. यात्रेकरु प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली. रीवा-सिधी सीमेजवळ चुहियाघाटीजवळ हा अपघात झाला. बाणसागर प्रकल्पाचा हा कालवा असून त्यामध्ये बस घसरली. या क्षणी पोलिसांची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जातंय.

आतापर्यंत या अपघातामधील मृतांचा आकडा 39वर पोहोचलाय. धक्कादायक बाब म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. आतापर्यंत 35 जणांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. तर सात जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मिळतेय. अजूनही या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

12 हून अधिक लोक स्वतः पाण्यातून बाहेर आले

एसडीआरएफ टीम घटनास्थळी बचावकार्य करते आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. बारा हून अधिक लोक स्वतः पाण्यातून बाहेर आले आहेत. अपघातानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली आणि बांसागर धरणातील कालव्याचे पाणी थांबविण्याचे आदेश दिले, जेणेकरून कालव्यातील पाणी कमी होईल आणि मदतकार्य वेगवान होऊ शकेल.

हेही वाचा – पर्वरीत दुचाकी चालकावर काळाचा घाला; एक जखमी

बसमध्ये जवळपास 50 जण बसले होते

बसमध्ये जवळपास 50 जणांचा समावेश असल्याची माहिती मिळतेय. या कालव्यात जास्त पाणी आहे, त्यामुळे संपूर्ण बस त्यात बुडाली आहे. अपघातानंतर जवळचे गावकरी आले आणि त्यांनी बऱ्याच लोकांना वाचवलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!