CORONA UPDATE | ब्रिटनकडून भारताची ‘रेड लिस्ट’मध्ये नोंद

प्रवाशांवर लावले निर्बंध

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात कोरोना विषाणूनं हाहाकार माजवला असून, दिवसागणिक मृत्यूची आकडेवारीही वाढत आहे. दररोज नवनवी प्रकरणे नोंद होत आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भारत भेट रद्द झाल्यानंतर ब्रिटनने आता भारताला प्रवासाच्या लाल यादीमध्ये टाकलंय. ब्रिटनने भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ‘डबल म्युटंट’ प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केलीय आणि आता लोकांना भारतातून ब्रिटनला जाता येणार नाही. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक म्हणाले की, केवळ ब्रिटिश आणि आयरिश नागरिक भारतातून ब्रिटनमध्ये येऊ शकतील.

पाकिस्तान आणि बांगलादेशही रेड लिस्टेड

आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक म्हणालेत की, रेड लिस्टेड देशाचे नागरिक ब्रिटनमध्ये आल्यास त्यांना सरकारने मंजूर केलेल्या क्वारंटाईन हॉटेलमध्ये राहण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या देशांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशची नावंही समाविष्ट आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत दौर्‍यावरून गेल्या काही दिवसांपासून ब्रिटन सरकारवर टीकेला सामोरं जावं लागत होतं. त्यानंतर हॅनकॉकने भारताला रेड लिस्टमध्ये टाकत असल्याची माहिती तिकडच्या संसदेत दिली.

हेही वाचाः CORONA UPDATE | दोडामार्गातून गोव्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘हा’ आहे नवीन नियम

सरकारांचे संयुक्त निवेदन जारी

भारतात कोरोना विषाणूची वाढती प्रकरणं आणि तेथे सापडलेल्या नवीन कोविड अवतारामुळे बोरिस जॉन्सन यांनी दौरा रद्द करत असल्याचा निर्णय घेतला. यापूर्वी जानेवारी महिन्यात बोरिस जॉन्सनचा भारत दौरा रद्द करण्यात आला होता. वर्ष 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर जॉन्सनचा यांचा भारताचा पहिला दौरा होता. भारत आणि ब्रिटन सरकारने संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की, “कोरोना विषाणूची सद्यस्थिती पाहता पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढील आठवड्यात भारतात येऊ शकणार नाहीत.”

हेही वाचाः सोमवारी रुग्णवाढ झाल्यानंतर मुख्यमंत्री तात्काळ दिल्लीला रवाना झाले, ते ‘या’ कारणासाठी

आता दोन्ही नेते चर्चा करतील

निवेदनात म्हटलं आहे की, जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस ब्रिटन आणि भारत यांच्यातील भावी भागीदारीसाठी महत्त्वाकांक्षी योजनांशी सहमत होण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी चर्चा करतील. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचं संकट भारताची राजधानी दिल्ली कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिघडलेली आहे, त्यामुळे सात दिवसांचे लॉकडाऊन लावण्यात आलंय. जॉन्सन जर भारतात आले असते तर ते राजधानी दिल्लीतच राहिले असते, परंतु इथे सध्या संसर्गामुळे परिस्थिती खूपच वाईट आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!